दिव्यांग OBC लाभार्थींना स्वयंरोजगारासाठी अल्प व्याजदराने थेट अर्थसहाय्य योजना

रत्नागिरी दि.२८ : शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ मर्यादित जिल्हा कार्यालय रत्नागिरी मार्फत इतर मागासवर्गीय प्रवर्गातील गरजू व्यक्ती/सामाजिक संस्था तसेच जिल्ह्यातील दिव्यांग लाभार्थ्यांना (इतर मागासवर्ग) सर्वांगिण कल्याण व विकासासाठी स्वयंरोजगाराकरीता अल्प व्याजदराने अर्थसहायाच्या
थेट कर्ज योजना, 20 टक्के बीज भांडवल योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना अशा विविध योजना महामंडळामार्फत राबविण्यात येतात.

या योजनांचा लाभ घेण्यासाठी जातीचा दाखला, रेशन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड व इतर कागदपत्रे आवश्यक आहे.

सदर योजना लाभ घेण्यासाठी www.msobcfdc.org या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे.
योजनेच्या अधिक माहितीकरीता जास्तीत जास्त इतर मागासवर्गीय नागरिकांनी शामराव पेजे कोकण इतर
मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ, मर्या., डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, पहिला मजला, पाटबंधारे स्टॉप, कुवारबाव रत्नागिरी अथवा जिल्हा व्यवस्थापक, प्रिती आर पटेल (मोबाईल क्रमांक 8484904637 व
अजित पाटील, बाह्य सेवा वसूली निरीक्षक (मोबाईल क्रमांक 7038388208) यांना संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक रत्नागिरी यांनी केले आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE