उरण दि २८ ( विठ्ठल ममताबादे) : उरण शहरातील वीर सावरकर मैदान येथे दि. 27/8/2023 रोजी सत्यम इंटरनेशनल या संस्थेच्या वतीने तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक स्पोर्टिंग एफसी, द्वितीय क्रमांक मस्तांग एफसी तर तृतीय क्रमांक आर डी एफ सी यांनी पटकाविला.

उरण तालुक्यातून उत्तमोत्तम भावी खेळाडू तयार व्हावेत. उरणचे नावलौकीक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर व्हावे या अनुषंगाने आयोजित केलेल्या या एकदिवसीय फुटबॉल स्पर्धेत प्रकूण 12 संघानी सहभाग घेतला त्यापैकी प्रथम क्रमांक स्पोर्टिंग एफसी, द्वितीय क्रमांक मस्तांग एफसी, तृतीय क्रमांक आर डी एफ सी यांनी पटकाविला.या विज्येत्या टिमचे तसेच सर्व खेळाडूंच्या कौशल्यांचे रसिक प्रेषकांनी तोंड भरून कौतूक केले.
उरण मध्ये पहिल्यांदाच सत्यम इंटर नॅशनल या संस्थेच्या माध्यमातून दिनेश सिंह, सविता सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला रसिक प्रेषकांचा उत्तम प्रतिसाद पहायला मिळाला.














