बहिणींना विदेश वारी घडवत स्वित्झरलँडमध्ये साजरे केले रक्षाबंधन!

रायगडमधील कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांचा उपक्रम

उरण (विठ्ठल ममताबादे ) : राजकीय,सामाजिक व कामगार क्षेत्रात अत्यंत व्यस्त असतानाही आपल्या परिवाराला वेळ देऊन आपली कौटुंबिक जबाबदारी सुद्धा महेंद्रशेठ घरत नेहमी पार पाडत असतात.आपले कुटुंब त्याच बरोबर भाऊ, बहिणी, मित्र व त्यांचे परिवार यांना वर्षातून परदेशवारी ते घडवत असतात.


दि. 22 ऑगस्टपासून परिवारातील तिस सदस्यांसह ते युरोप टूर वर आहेत.जर्मनी नंतर स्विझरलॅन्ड येथे असतांना आपल्या बहिणीं सोबत त्यांनी पारंपारिक रक्षाबंधन सण साजरा केला. प्रत्येकाने आपल्या बहिणींचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे तसेच प्रत्येकाने आपल्या गृहलक्ष्मीचा सन्मान करावा असा संदेश त्यांनी यावेळी दिला.सोबत असलेल्या सर्व महिला भगिनींनी महेंद्रशेठ घरत यांना राखी बांधून स्विझरलॅन्ड मध्ये रक्षाबंधन सण साजरा करावयास मिळाल्याने आनंद व्यक्त केला.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

Pelli Poola Jada

READ MORE