Konkan Railway | कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या दोन्ही राजधानी एक्सप्रेसला रतलाम थांबा

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या दोन एक्सप्रेस गाड्यांना रतलाम स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. नव्याने थांबा देण्यात आलेल्या या दोन गाड्यांमध्ये तिरुअनंतपुरम ते हजरत निजामुद्दीन तसेच मडगाव ते हजरत निजामुद्दीन दरम्यान धावणाऱ्या दोन राजधानी एक्सप्रेसचा समावेश आहे.

देशभरातील विविध गाड्यांना अलीकडेच काही अतिरिक्त थांबे देण्यात आले आहेत. त्यानुसार कोकण रेल्वे मार्गावर नेत्रावती एक्सप्रेसला संगमेश्वर रोड स्थानकावर तर एलटीटी- कोचुवेली तसेच रोज धावणाऱ्या मंगला एक्सप्रेसला खेड स्थानकावर थांबे देण्यात आले आहेत.

आता कोकण रेल्वे मार्ग धावणाऱ्या हजरत निजामुद्दीन ते तिरू अनंतपुरम दरम्यान धावणारी राजधानी एक्सप्रेस(12431/32) तसेच हजरत निजामुद्दीन ते मडगाव दरम्यान धावणारी (22414/13) ही आणखी एक कोकण रेल्वे मार्ग धावणारी राजधानी एक्सप्रेस या दोन्ही राजधानी एक्सप्रेस गाड्यांना मध्यप्रदेश राज्यातील रतलाम स्थानकावर प्रायोगिक स्तरावर थांबा देण्यात आला आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

Pelli Poola Jada

READ MORE