https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

कोकण रेल्वे मार्गावर १४ सप्टेंबरला तीन तासांचा ‘मेगाब्लॉक’

0 76

तीन गाड्यांच्या वेळापत्रकावर होणार परिणाम

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर गोव्यातील मडगाव ते कर्नाटकमधील कुमटा सेक्शन दरम्यान देखभालीच्या कामासाठी कोकण रेल्वेकडून ३ तासांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.

या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार मडगाव ते कुमटा दरम्यान दि. १४ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत मार्गावरील देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.

या गाड्यांच्या वेळापत्रकावर होणार परिणाम


१) या मेगाब्लॉकमुळे उधना- मंगळूरू (09057) ही विशेष गाडी जिचा प्रवास 13 सप्टेंबर रोजी सुरू होतो ती दिनांक 14 रोजी रत्नागिरी ते मडगाव दरम्यान 105 मिनिटे थांबवून ठेवली जाणार आहे.

२) मंगळूरु सेंट्रल ते मडगाव (06602) ही 14 सप्टेंबर रोजी प्रवास सुरू होणारी विशेष गाडी कुमठा स्थानकापर्यंत चालवली जाणार आहे. कुमटा ते मडगाव तालुका दरम्यान ही गाडी रद्द केली जाईल.

३) दिनांक 14 सप्टेंबर 2023 रोजी धावणारी मडगाव ते मंगळूरु विशेष गाडी (06601) मडगाव ऐवजी कुमठा येथून मंगळूरूला जाण्यासाठी सुटणार आहे. मडगाव ते कुमठा दरम्यान ही गाडी रद्द केली जाईल.

Leave A Reply

Your email address will not be published.