रत्नागिरी : दावते इस्लामी शाखा रत्नागिरी तर्फे दि.२९ सप्टेंबर २०२३ रोजी ईद ए मिलादचे औचित्य साधून जुलूस (रॅली)चे आयोजन करण्यात आले आहे.

मद्रसा फैजाने अत्तार कोकणनगर येथून ठीक सकाळी ८.३० वाजता जुलूस निघणार आहे. या रॅलीचा मार्ग कोकणनगर, किर्तीनगर, मारूती मंदीर, उद्द्मनगर ते फैजाने अत्तार येथे शेवट होईल. या रॅलीमध्ये सर्व मुस्लिम बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन दावते इस्लामी शाखा रत्नागिरीतर्फे करण्यात आले आहे.
