नवरात्रीनिमित्त शारदेच्या कन्यांनी भरली ‘साहित्य ओटी’


रत्नागिरी : आम्ही सिद्ध लेखिका साहित्य संस्था रत्नागिरी या संस्थेच्या जिल्हा सदस्यांनी रत्नागिरीमध्ये ‘आम्ही कन्या’ शारदेच्या हा कार्यक्रम आयोजित केला होता. या वेळी देवी सरस्वतीची रूपं असणाऱ्या या सर्व महिला सदस्यांच्या संस्थेच्या रत्नागिरी जिल्हा अध्यक्षा सुनेत्रा जोशी यांनी तांदूळ सुपारी यासह एक उत्तम पुस्तक देत ‘साहित्य ओटी’ भरली. अर्चना देवधर यांनी सुगंधी अत्तर भेट देत या साहित्य ओटीचा आनंद सुगंधित केला.


आम्ही सिद्ध लेखिका समुहाचा हा कार्यक्रम शर्वाणी मिनी मीटिंग हॉल इथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अधक्ष्या सौ. अनुराधा दीक्षित होत्या. प्रस्ताविक सुनेत्रा जोशी यांनी केलं तर सूत्रसंचालन ऋतुजा कुलकर्णी यांनी केलं.

या कार्यक्रमाला उपस्थित उमा देवळे, लता जोशी, शमा प्रभुदेसाई, सोनाली सावंत, नीलिमा जोशी, प्राजक्ता दामले, अर्चना देवधर, उमा जोशी तसचं सुनेत्रा जोशी, अनुराधा दीक्षित ऋतुजा कुलकर्णी दर्दी साहित्य प्रेमी महिला सदस्यांनी कथा, कविता, आरती, जोगवा इत्यादीच सादरीकरण केलं. तसचं स्वरचित आणि पारंपरिक गाण्यावर भोंडला ही खेळला.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE