Konkan Railway | कोकणातून धावणाऱ्या तीन एक्सप्रेस गाड्यांना माणगाव स्थानकावर प्रायोगिक थांबा

कु. प्रिया मालुसरे यांच्या पाठपुराव्याला यश

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या तीन एक्सप्रेस गाड्यांना रायगड जिल्ह्यातील माणगाव स्थानकावर प्रायोगिक तत्त्वावर थांबा देण्यात आला आहे. यासाठी भाजपच्या सुरतमधील प्रभाग क्रमांक ९ मधील महिला मोर्चा महामंत्री कु. प्रिया संतोष मालुसरे यांनी रेल्वेकडे पाठपुरावा केला होता. अखेर या प्रयत्नांना यश आले असून रेल्वेने गुजरातमधून कोकण रेल्वे मार्गावर येणाऱ्या तीन गाड्यांना माणगावला थांबा दिला आहे.

या संदर्भात कोकण रेल्वेकडून प्राप्त माहितीनुसार वेरावल त्रिवेंद्रम (16333) या गाडीला वेरावल येथून दिनांक १९ ऑक्टोबर 2023 च्या फेरीपासून तर ही गाडी परतीच्या प्रवासात असताना (16334) तिला त्रिवेंद्रम सेंट्रल येथून २३ ऑक्टोबर च्या फेरीपासून माणगाव स्थानकावर प्रायोगिक थांबा देण्यात आला आहे.


याचबरोबर कोचुवेली ते भावनगर (19259) कोचुवेली येथून दिनांक 19 ऑक्टोबरपासून तर भावनगर ते कोचुवेली या मार्गावर धावताना (19260) दि. २४ ऑक्टोबरच्या फेरीपासून माणगाव स्थानकावर थांबणार आहे.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या कार्यालयात रोहा, माणगाव स्थानकावर गुजरातमधून येणाऱ्या गाड्यांना थांबा देण्यासंदर्भात निवेदन सादर केल्यानंतर कार्यालयातील अधिकाऱ्यांसमवेत कु. प्रिया मालुसरे.


कोकण रेल्वे मार्गे धावणारी गांधीधाम ते नागरकोइल एक्सप्रेस(16335) या गाडीला देखील माणगाव स्थानकावर दिनांक 20 ऑक्टोबर 2023 च्या फेरीपासून प्रायोगिक थांबा देण्यात आला आहे. ही गाडी परतीच्या प्रवासात असताना (16336) 24 ऑक्टोबर 2023 पासून माणगाव स्थानकावर प्रायोगिक थांबा घेणार आहे.

गुजरातमधील अहमदाबाद, सुरत आदी भागात रायगडमधून नोकरी व्यवसायानिमित्त गेलेले अनेक जण असल्यामुळे माणगाव, रोहा या रायगड जिल्ह्यातील थांब्यांवर गुजरात मधून येण्या येणाऱ्या गाड्यांना थांबा मिळावा यासाठी प्रिया मालुसरे यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यामार्फत रेल्वेकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE