https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

रत्नागिरी येथे २१ ऑक्टोबरला जिल्हा अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा

0 69

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशनच्या वतीने रत्नागिरी जिल्ह्यातील पुरुष वरिष्ठ गट फ्रि स्टाईल, गादी, माती ग्रिकोरोमन, वरिष्ठ महिला, कुमार गट मुले, मुली जिल्हा अजिंक्य पदाच्या कुस्ती स्पर्धा शनिवार दि. २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.०० वाजता गुरुकृपा मंगल कार्यालय, पर्‍याची आळी रत्नागिरी येथे घेण्यात येणार आहेत.

सदर कुस्ती स्पर्धेमध्ये रत्नागिरी जिल्ह्यामधील स्थानिक कुस्तीगिरांना भाग घेता येईल. यासाठी जन्मतारखेचा दाखला म्हणून आधार कार्ड, नगर परिषद, ग्रामपंचायत यांचा मुळप्रति मधील जन्म दाखला आणणे गरजेचे आहे. खेळाडूंनी रेशनकार्डाची मुळप्रत आणणे आवश्यक आहे. वास्तव्याबाबत शंका किंवा तक्रार झाल्यास तसेच खेळासंबंधी कोणतीही तक्रार झाल्यास असोसिएशनचा निर्णय अंतिम राहिल. प्रवेश फी वरिष्ठ गट पुरुष, गादी, माती, ग्रिकोरोमन गट २००रु. व प्रौढ गट महिला, कुमार गट मुले, मुली १००रु. अशी आहे. तरी कुस्तीगिरांनी खेळण्याच्या गणवेशासह शनिवार दि. २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.०० वाजता हजर रहावे. जिल्हा स्पर्धेसाठी स्वखर्चाने जाणे-येणेचे आहे. वरील कुस्ती स्पर्धेमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक कुस्तीगीरांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल याबाबत सर्व अधिकारी असोसिएशनकडे राहतील. राज्य व राष्ट्रीय स्पर्धेच्या तारखांप्रमाणे वयोगटांच्या तारखांमध्ये बदल होईल. येताना सोबत २ पासपोर्ट साईज फोटो आणावे. श्री. रविंद्र उर्फ अण्णासाहेब द्वारकानाथ सामंत अध्यक्ष श्री साई अनिरुद्ध एज्युकेशन सोसायटी, यांच्या सौजन्याने या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे.

अधिक माहितीसाठी श्री. श्रीकृष्ण विलणकर अध्यक्ष मो. ९४२३२९०७५४, श्री. सदानंद जोशी प्र. कार्यवाह मो. ९४२२३७२२९६, डॉ. श्री. चंद्रशेखर केळकर कार्याध्यक्ष, श्री. संतोष कदम उपाध्यक्ष, श्री. अमित विलणकर उपाध्यक्ष श्री. योगेश हरचेरकर सहकार्यवाह मो. ९४२३२९२३५०, श्री. वैभव चव्हाण सहकार्यवाह मो. ९८८१७८८४५१ श्री. आनंद तापेकर मो. ८८०५६६३३६६ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.