रत्नागिरीत विजयादशमीपर्यंत रोज ‘दुर्गामाता दौड’चे आयोजन
रत्नागिरी: नवरात्रोत्सवानिमित्त रत्नागिरी शहरातून आज पाचव्या दिवशी दुर्गामाता दौड मारुती मंदिर – आरोग्य मंदिर – शिवाजी नगर-मारुती मंदिर या मार्गे नेण्यात आली.
गुरुवारी पाचव्या दिवशी रत्नागिरीतील बाळगोपाळ मित्र मंडळ या नवरात्र मंडळात दौड नेण्यात आली. पतंजलीचे मुख्य योग प्रशिक्षक व आंतरराष्ट्रीय योग प्रशिक्षक श्री. वीरू स्वामी सर यांच्या हस्ते ध्वजास पुष्पहार अर्पण करून दौडीची सुरूवात करण्यात आली. तसेच आजच्या ध्वजाचे नेतृत्व मरूधर समाजाच्या वतीने श्री. रविंद्र सिंह राणावत यांनी केले.
ही दौड घटस्थापना ते विजयादशमी दसरा या कालावधीत रोज रत्नागिरी शहरातील विविध भागात मार्गक्रमण करणार आहे.
प्रत्येक व्यक्ती मध्ये राष्ट्रभक्ती,धर्मभक्ती, देशभक्ती, सत्व स्वाभिमान जागृत करणाऱ्या या “श्री दुर्गामाता दौड” या उपक्रमात सर्व शिवप्रेमीनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान रत्नागिरीतर्फे करण्यात येत आहे.
वेळ : सकाळी ५.४५ वाजता
स्थळ : मारुती मंदिर सर्कल.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, रत्नागिरी
- तालुका अध्यक्ष : श्री राकेश नलावडे (९८२२७०६९२३)