गणपतीपुळे, गुहागर, दापोलीसह जिल्ह्यातील पर्यटन स्थळे गजबजली!
गणपतीपुळयात दोन दिवसांत हजाराे पर्यटकांची भेट, वाहनांच्या मोठमोठ्या रांगा
रत्नागिरी – शाळा, महाविद्यालये सुरू होण्यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी शिल्लक असला तरीही मान्सूनचे आगमन लवकर होण्याची शक्यता असल्यामुळे पर्यटकांनी मे महिन्याच्या शेवटच्या शनिवारी, रविवारी गणपतीपुळेसह जिल्ह्याच्या किनाऱ्यावर प्रचंड गर्दी केली होती. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गासह रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरही वाहतूक कोंडी होत होती. जिल्ह्यातील दापोली, गुहागर, आरेवारे या ठिकाणीही अशीच स्थिती आहे.
प्रसिद्ध गणपतीपुळेमध्ये दोन दिवसात सुमारे चाळीस हजार पर्यटकांनी भेट दिल्याची नोंद झाली.