वाढदिवसानिमित्त रक्तदान व अन्नदान उपक्रम
माजी आ. मनोहरशेठ भोईर यांच्या वाढदिवशी उरणमध्ये आयोजन
उरण (विठ्ठल ममताबादे ) : उरण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त उरण तालुक्यात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 1 जून रोजी माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांचे वाढदिवसानिमित्तअवजड वाहतूक सेना उरण तालुका उपाध्यक्ष कुणाल अरुण पाटील यांच्या संकल्पनेतून कुंडेगाव – पागोटे नाका, पंप हाऊस जवळ उरण येथे महा रक्तदान शिबीर व अन्नदानाचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराचे उदघाटन माजी आमदार मनोहर भोईर यांनी केले. तालुका उपाध्यक्ष कुणाल पाटील यांनी या अगोदर कोरोना काळात अनेक सामाजिक काम केले. वैद्यकीय मदत केली. अन्नदान केले. गोरगरिबांना मदत केले. यावेळी माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत तालुका उपाध्यक्ष कुणाल पाटील यांनी रक्तदान, अन्नदानाचे आयोजन केले होते. या उपक्रमाला जनतेचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.एकूण 51 रक्त दात्यांनी रक्तदान केले. मोठया संख्येने नागरिकांनी अन्नदानाचा लाभ घेतला.सद्गुरू चॅरिटेबल ब्लड सेंटर, कोपरखैरणे यांचे सहकार्य रक्तदानासाठी लाभले. यावेळी मेडिकल सोशल वर्कर -हरमीतसिंग कोहली, टेक्निशियन -कोमल चिकणे, सायली गोडके, रुचिता तुपे, गौरी खानविलकर, विकास आम्रे उपस्थित होते. रक्तदान केलेल्या दात्यांना प्रमाणपत्र व बॅगचे वाटप कुणाल पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर, उद्योजक विकास भोईर, शिवसेना अवजड वाहतूक सेनेचे रायगड जिल्हाध्यक्ष दिपक निकम,उपजिल्हाध्यक्ष नरेश रहाळकर, अवजड वाहतूक सेना तालुका संघटक बी एन डाकी,अवजड वाहतूक उरण तालुकाध्यक्ष चेतन म्हात्रे,पंचायत समिती सदस्य दिपक ठाकूर,तालुका संपर्क प्रमुख अवजड वाहतूक सेना धीरज बुंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष भार्गव पाटील, न्हावा शेवा महासंघाचे अध्यक्ष लंकेश ठाकूर, स्वामी समर्थ डेव्हलोपर्सचे प्रणित पाटील, नवघर शाखा प्रमुख अविनाश म्हात्रे,शिवसेना पागोटे शाखेचे सल्लागार रमेश पाटील, पागोटे उप शाखा प्रमुख महेश पाटील, सेक्रेटरी प्रदीप पाटील, खजिनदार मनोहर तांडेल, माजी शाखा प्रमुख अनिल पाटील, उपसरपंच नवघर रवी वाजेकर, नवघर माजी उपसरपंच हितेश भोईर, शिवसैनिक दिपक पाटील, चाईल्ड केअर सामाजिक संस्थेचे विकास कडू आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसेना शाखा पागोटे, शिवसेना शाखा नवघर, शिवसेना शाखा नवघर पाडा, शिवसेना शाखा कुंडेगावचे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.