रत्नागिरी, दि. ८ : जिल्ह्यातील 8 तालुक्यांमधील 1304 तपासणी गावांच्या संख्येत काल अखेर केलेल्या रजिस्टर तपासणीमध्ये 69 कुणबी मराठा नोंद मिळाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली.
कालअखेर मंडणगडमध्ये 5, दापोलीमध्ये 8, खेडमध्ये 5, चिपळूण मध्ये 22, रत्नागिरीमध्ये 1, राजापूरमध्ये 28 अशा एकूण 69 कुणबी मराठा बाबत कागदपत्र तपासणीत नोंदी मिळून आल्या आहेत.
