उरण दि ८(विठ्ठल ममताबादे ) : भारतातील प्रमुख बंदरांमधील बंदर व गोदी कामगारांच्या वेतनवाढीबाबत दिल्लीमध्ये दि.६/११/२०२३ रोजी द्विपक्षीय वेतन समितीची सभा संपन्न झाली. या वेतन करार समितीमध्ये कामगार नेते सुरेश पाटील हे भारतीय मजदूर महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री आणि या वेतन करार समितीचे सदस्य म्हणून त्यांनी कामगारांच्या बाजूने भक्कम बाजू मांडली.
या वेतन करार समितीत खालील बाबी द्विपक्षीय चर्चेत मान्य करण्यात आल्या
- १) वेतन कराराचा कालावधी पाच वर्षांचा असेल.
- 2) बढतीच्या वेळेस आता असलेली वेतन निश्चिती अस्तित्वात असलेल्या प्रथे प्रमाणे राहील.
- ३) घर भाडे भत्ता आता अस्तित्वात असलेल्या प्रथेप्रमाणे राहील.
- ४) प्रवास भत्ता ११०० रुपयावरून १५०० रुपये करण्यात आला, त्यावर महागाई भत्ता (D A) मिळेल.
- ५) धुलाई भत्ता १९४ रुपयावरून २४० रुपये व २५० रुपयावरून ३०० रुपये करण्यात आला.
- ६) एल.टी.सी.आता अस्तित्वात असलेल्या प्रथेप्रमाणे मिळेल.
- ७)ओव्हर टाईम,नाईट वेटेज, हार्ड शिफ्ट अलाउन्स, प्रोटेक्शन क्लोज याबाबत आयपीए ड्राफ्ट देणार.
- तसेच खालील मागण्यांवर चर्चा करणे बाकी असून त्या पुढील वेतन करार समितीच्या सभेमध्ये त्यावर चर्चा होईल.
- १) कॅफेटेरिया.
- २) सुधारित वेतनश्रेणी.
- ३) वार्षिक पगार वाढीचा दर.
- ४) फिटमेंट ऑफ पे.
- ५) महागाई भत्ता.
- ६) ऑप्शन ऑन पे फिक्सेश
- ७) पगारवाढीची थकबाकी.
- अशाप्रकारे वेतन करार समितीची सभा संपन्न होऊन त्यात कामगार नेते सुरेश पाटील व ६ मान्यता प्राप्त महासंघाचे प्रतिनिधी यांनी कामगारांच्या हिताची फलदायी चर्चा घडवून आणली.
