उरण दि. १२( विठ्ठल ममताबादे ) : सुधीर घरत सामाजिक संस्था नवघर- उरणच्या माध्यमातून वर्षभरात विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिवाळी सणाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत सुधीर घरत सामाजिक संस्था नवघर उरणतर्फे उरण तालुक्यातील चिरनेर येथील केळ्याची माळ या आदिवासी वाडी वर आदिवासी बांधवाना दिवाळी फराळ व भेटवस्तू देऊन आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली.

यावेळी सुधीर घरत सामाजिक संस्थेचे सुधीर भाई घरत (संस्थापक ), जयप्रकाश पाटील (अध्यक्ष ),जयप्रकाश भोईर (कार्याध्यक्ष ), अजित पाटील (उपाध्यक्ष ),संकेत कडू (सेक्रेटरी ),हरेश बंडा (सचिव ), ज्ञानेश्वर भोईर (सदस्य),
सुधीर भाई घरत मित्र परिवार व विविध मान्यवर उपस्थित होते. नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य पद्माकर फोफेरकर, उरण विधानसभा युवक इंटक अध्यक्ष राजेंद्र भगत, सामाजिक कार्यकर्ते रोशन कातकरी, काँग्रेस युवा नेता पियुष पद्माकर फोफेरकर, सुप्रसिद्ध निवेदक नितेश पंडित आदींचे या कार्यक्रमाला विशेष सहकार्य लाभले.
जीवनात दुसऱ्याला आनंद देता देता आपणही काही आनंदाचे क्षण जगू आणि एकदाच मिळणाऱ्या या मनुष्यजन्माचे सार्थक करूया या युक्ती प्रमाणे सुधीर घरत सामाजिक संस्थेच्या मार्फत दिवाळी फराळ व भेटवस्तू वाटप करण्यात आले. फराळ वाटप व भेट वस्तू मिळाल्याने आदिवासी बांधवांनी आनंद व्यक्त केला. उपस्थित आदिवासी बांधवांनी सुधीर घरत सामाजिक संस्थेच्या सर्व पदाधिकारी, सदस्यांचे आभार मानले. एकंदरीत सुधीर घरत सामाजिक संस्थेतर्फे आदिवासी बांधवांना फराळ व भेटवस्तू वाटपाचा कार्यक्रम मोठया उत्साहात, उत्तम प्रतिसादात संपन्न झाला.
