मुंबईतील मेळाव्यात कोकणवासीयांच्या समस्यांबाबत खा. विनायक राऊत यांना निवेदन

मुंबई : मुंबईत भांडुप येथे झालेल्या कोकणवासीयांच्या जाहीर मेळाव्यात रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांना कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघामार्फत कोकणवासीयांच्या विविध समस्यांसंदर्भात निवेदन देण्यात आले.

रविवार दि. २६ नोव्हेंबर रात्रौ ८ वा. श्री. संजय (भाऊ) दिना पाटील यांनी भांडूप पश्चिम येथे आयोजित केलेल्या कोकणवासियांच्या जाहीर मेळावा या कार्यक्रमात रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार (उबाठा) खासदार विनायक राऊत तसेच शिवसेना (उबाठा) सचिव आदेश बांदेकर यांना कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ (रजि) ठाणे संघटनेचे सदस्य यांची सदिच्छा भेट घेत कोकणवासियांच्या समस्यांबाबतचे निवेदन पत्रक दिले.

या मागण्यांकडे वेधले लक्ष


सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकास श्री मधू दंडवते टर्मीनस असे नामांकरण करणेसंबधी.
सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकात महत्त्वाच्या गाड्यांस थांबे आणि स्थानक सुधारणा करणेसंबंधी.
मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण काम मार्गी लावून लवकरात लवकर लोकार्पण केले जावे अशा विषयांसंबंधीचे निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे
श्री. राजू सुदाम कांबळे – प्रमुख सल्लागार, श्री. संभाजी बाळू ताम्हणकर – खजिनदार, श्री. परेश महीपत गुरव – सचिव, श्री. दर्शन पांडुरंग कासले – सचिव, श्री. प्रसन्ना दिनकर फावसकर – उपखजिनदार, मंगेश घाडीगांवकर
अमित चव्हाण, जितेंद्र बाईत आदी उपस्थित होते.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE