रत्नागिरीची रिध्दी चव्हाण खो खो च्या महाराष्ट्र संघात
- राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत प्रतिनिधित्व करणार ; आकाश सोळंखे सहाय्यक प्रशिक्षक
रत्नागिरी ः पालघर येथे झालेल्या किशोर-किशोरी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेमधून निवडण्यात आलेले महाराष्ट्राचे संघ राज्य खो-खो असोसिएशनचे सचिव अॅड. गोविंद शर्मा यांनी जाहीर केले. हे संघ १३ ते १७ डिसेंबर या कालावधीत कर्नाटक टिपटूर येथे होणार्या किशोर, किशोरी राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होतील. किशोरी संघात रत्नागिरीची रिध्दी चव्हाणची निवड झाली असून किशोर गटाच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी लांजा येथील आकाश सोळंखे यांची निवड झाली आहे.
पालघर येथे ३० नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या कालावधीत झालेल्या किशोर-किशोरी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेमधून प्रत्येकी १५-१५ जणांच्या संघाची निवड करण्यात आली. या निवडीसाठी राज्य खो-खो असोसिएशनने चार सदस्यीय निवड समिती नियुक्ती केली होती.
आज किशोर-किशोरी गटाचे राज्याचे संघ जाहीर करण्यात आले. या वेळी किशोर गटाच्या कर्णधारपदी धाराशिवच्या हाराध्या वसावे व किशोरी गटाच्या कर्णधारपदी मैथिली पवार यांची निवड करण्यात आली. हा संघ कर्नाटक टीपटूर येथे होणार्या ३३ व्या किशोर, किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होणार आहे. या संघाला खो-खो असोसिएशनचे आश्रयदाते उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीव नाईक-निंबाळकर, खो-खो फेडरेशनचे सहसचिव डॉ. चंद्रजीत जाधव, राज्य खो-खो असासेसिएशनचे सरचिटणीस अॅड. गोविंद शर्मा, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार अॅड. अरूण देशमुख, माजी सचिव संदिप तावडे यांच्यासह सर्व पदाधिकार्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्राच्या संघात रत्नागिरी जिल्ह्याच्या रिध्दी चव्हाणची निवड झाली असून तिला राष्ट्रीय प्रशिक्षक पंकज चवंडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
निवडलेले संघ असे
किशोर गट – हाराध्या वसावे (कर्णधार), भीमसिंग वसावे, महेश पाडवी, वीरसिंग पाडवी (सर्व धाराशिव), विनायक मांगे, ओमकार सावंत, बसुराज कंपापुर (सर्व ठाणे), आदेश पाटील, सम्राट पांढरे (सर्व पुणे), प्रथमेश कुंभार, प्रसादा बलीप (सातारा), श्री दळवी (सांगली), कार्तिक साळुंखे (छत्रपती संभाजीनगर), मीत दवणे (पालघर). मयूर परमाळे (प्रशिक्षक, पुणे), उमाकांत गायकवाड (सहाय्यक प्रशिक्षक, सोलापूर), जगदीश दवणे (व्यवस्थापक, पालघर).
किशोरी संघ
मैथिली पवार (कर्णधार, धाराशिव), कल्याणी लामकाने, स्नेहा लामकाने, समृध्दी सुरवसे, अनुजा पवार (सर्व सोलापूर), समृध्दी भोसले, मुग्धा वीर (धाराशिव), वैष्णवी चाफे, वेदिका तामखडे (सर्व सांगली), धनश्री लव्हाळे, अक्षरा ढोले (सर्व पुणे), गौरी जाधव (सातारा), वैष्णवी जाधव (ठाणे), रिध्दी चव्हाण (रत्नागिरी), शितल गांगुर्डे (नाशिक). प्रशिक्षक ः महेंद्र गाढवे (सातारा), सहाय्यक आकाश सोळंखे (रत्नागिरी), व्यवस्थापिका सौ. अश्विनी दवणे (पालघर).