रत्नागिरी : कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करावे, अशा मागणीची दखल घेत या मागणीला समर्थन देत रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे विलीनीकरण तातडीने केले जावे याकडे लक्ष वेधले आहे.
गेल्याच आठवड्यात कोकण विकास समितीने कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण व्हावे, अशी मागणी केंद्रीय रेल्वेमंत्री श्री. अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री श्री. रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थमंत्री श्रीम. निर्मला सीतारामन व संबंधित सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींकडे केली होती.

या मागणीची तातडीने दखल घेऊन रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी या रास्त व न्याय्य मागणीला पाठिंबा देऊन लवकरात लवकर कोंकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण अशी मागणी केंद्रीय रेल्वे मंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.
- हेही अवश्य वाचा : Konkan Railway | दिवा-रत्नागिरी पॅसेंजर लवकरच धावणार नव्या रंगरूपात !
- Konkan Railway | तीन महिन्यात विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून ८६ लाख ६७ हजारांचा दंड वसूल
- Konkan Railway | ख्रिसमससाठी कोकण रेल्वे मार्गावर आणखी चार विशेष गाड्या
