https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

रत्नागिरीत दानशूर भागोजीशेठ किर यांचा २१ फुटी पुतळा उभारा!

0 98

  • उघड्यावर पांडुरंगाची मूर्ती उभारण्यापेक्षा विठ्ठल मंदिराचा विकास करा!
  • भाजपच्या पंचायतराज व ग्रामविकास विभागाचे रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा संयोजक योगेश हळदवणेकर यांची मागणी

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील शिर्के गार्डन येथे भगवान पांडुरंगाची मूर्ती उभारण्याचा घाट आपण घालण्यात येत आहे. प्रत्यक्षात पांडुरंग हा देव असून त्याची जागा मंदिरात आहे. त्यामुळे उघड्यावर देवाला आणू नये, अशी मागणी भाजपच्या पंचायतराज व ग्रामविकास विभागाचे रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा संयोजक योगेश हळदवणेकर यांनी केली आहे.

रत्नागिरी नगर परिषदेला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आपल्याला २१ फुटी पुतळाच उभरायचा असेल तर तो दानशूर भागोजीशेठ किर यांचा उभारण्यात यावा! देवासाठी मंदिर बांधावे, थोर पुरुषांचे पुतळे उभारावेत, इतका विचार आपण करत नसाल तर आपण समस्त हिंदु समाज बांधवांच्या भावना दुखावत आहात. तेव्हा याबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊन दानशूर भागोजीशेठ किर यांचा पुतळा उभारावा आणि पांडुरंगाची जागा मंदिरातच असावी या हेतूने रत्नागिरीतील विठ्ठल मंदिराचा विकास करण्याबाबत कार्यवाही व्हावी. तसेच विठ्ठलाचा पुतळा उघड्यावर उभारू नये, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनाची प्रत आपले सरकार पोर्टलला अपलोड करण्यात आली असून मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना निवेदन पाठजविण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.