रत्नागिरी, दि. १२ (जिमाका)- ‘रत्नागिरी महासंस्कृती महोत्सव-२०२४’ अंतर्गत उद्या मंगळवारी १३ फेब्रुवारी रोजी शाहीर नंदेश उमप आणि कलाकार यांचा ‘महाराष्ट्राची संस्कृती’ हा कार्यक्रम होणार आहे.
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय व रत्नागिरी जिल्हा प्रशासनाच्यावतीने येथील प्रमोद महाजन क्रीडा संकुलात काल रविवारपासून ‘रत्नागिरी महासंस्कृती महोत्सव-२०२४’ ला सुरुवात झाली आहे. याला रत्नागिरीकरांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या महोत्सवात पारंपरिक कलाप्रकारही स्थानिक कलाकारांकडून सुरुवातीलाच सादर करण्यात येत आहे.
१५ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवाचा आस्वाद रसिक प्रेक्षकांनी घ्यावा.