संगमेश्वर : प्रा. प्रकाश अर्जुन राजेशिर्के व सौ. युगंधरा प्रकाश राजेशिर्के यांच्या चिपळूण तालुक्यातील खरवते येथील शेत जमिनीत सोमवार २६ फेब्रुवारी रोजी दुपारी लागलेल्या वणव्यामुळे आंबा, काजू, केळी, नारळ, कडधान्य पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
मेहनतीने स्वतः शेतात राबून प्रा. प्रकाश राजेशिर्के व सौ. युगंधरा राजेशिर्के यांनी फळझाडे व कडधान्यांची लागवड केली होती. चित्रकार, शिल्पकार, लेखक याचबरोबर उत्तम शेतकरी म्हणून त्यांची ओळख झाली आहे. त्यांनी कले बरोबर वेळात वेळ काढून हा छंद झोपासला आहे. सकाळी शेतावर गेल्यावर त्यांचा कधी पूर्ण दिवस शेतात जातो याचे त्यांना भान राहत नाही. एखाद्या मुलाप्रमाणे त्यांनी फळझाडे वाढवली होती. पण लागलेल्या आकस्मित वणव्यामुळे मुळे सर्व झाडे त्यात होरपळून राख झाली.काही दिवसापूर्वी टवटवीत, जोमाने उभी असणारी झाडे आज काळी ठिक्कर पडली आहेत.