कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या तीन सुपरफास्ट एक्सप्रेस सीएसएमटी ऐवजी दादरपर्यंतच धावणार!

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या तीन सुपरफास्ट एक्सप्रेस गाड्या दि ७ जुलै २०२४ पर्यंत त्यांच्या निर्धारित सीएसएमटी जंक्शन ऐवजी दादरपर्यंतच धावणार आहेत.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील 4 फलाटांच्या विस्तारीकरणाचे काम मध्य रेल्वेने हाती घेतल्यामुळे हा बदल करण्यात आला आहे.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरील दहा अकरा बारा तेरा या क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मच्या विस्तारीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे.

या कामामुळे मंगळुरू जंक्शन ते सीएसएमटी (12134), मडगाव जंक्शन ते मुंबई सीएसएमटी (22120) तेजस एक्सप्रेस तसेच मडगाव जंक्शन ते मुंबई सीएसएमटी दरम्यान रोज धावणारी जनशताब्दी एक्सप्रेस(12052) या तिन्ही सुपरफास्ट एक्सप्रेस गाड्या दिनांक सात जुलै 2024 पर्यंत त्यांचा मुंबई दिशेने होणारा प्रवास दादरलाच संपवणार आहेत.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE