आरवलीनजीक गोव्याला जाणाऱ्या  जनशताब्दी एक्सप्रेसचे इंजिन नादुरुस्त

रत्नागिरी : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या दैनंदिन जनशताब्दी एक्सप्रेसचे इंजिन शुक्रवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास आरवली रोडनजीक नादुरुस्त झाले. यामुळे मडगावकडे जाणारी ही सुपरफास्ट गाडी पर्यायी इंजिन उपलब्ध होईपर्यंत आरवली येथे जवळपास दोन तास थांबवून ठेवण्यात आली होती.

मुंबईहून गोव्यात मडगावला जाण्यासाठी निघालेली गाडी क्र. १२०५१ ही सुपरफास्ट गाडी नजीक आली असता गाडीचे इंजिन बिघडले. चिपळूण येथून ही गाडी 10 वाजून दोन मिनिटांनी तिच्या पुढील निर्धारित थांबा असलेल्या रत्नागिरीच्या रत्नागिरीच्या दिशेने रवाना होते. मात्र शुक्रवारी ही गाडी तिच्या निर्धारित वेळेपेक्षा सावर्डे स्थानकापर्यंत 40 मिनिटे विलंबाने धावत होती. पुढे आरवली नजीक तिचे इंजिन खराब झाल्याने दुपारी साडेबारा वाजेपर्यंत ती आ lरवली येथे उभी होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पर्यायी इंजिन जोडून ही गाडी पुढील प्रवासासाठी मडगावच्या दिशेने मार्गस्थ करण्यासाठी रेल्वेचे प्रयत्न सुरू आहेत.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE