पेडणे येथील बोगद्यात उद्भवलेल्या समस्येमुळे रेल्वेचा निर्णय
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील मधुर येथे पेडणे दरम्यान असलेल्या टनेलमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी जमा झाल्याने कोकण रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आज दिनांक 10 जुलै रोजी मुंबईसाठी नेहमी मडगाव येथून सुटणारी मडगाव जंक्शन ते मुंबई सीएसएमटी (20112) ही कोकण कन्या एक्सप्रेस सावंतवाडी रोड स्थानकातून मुंबईसाठी सुटणार आहे.
पेडणे बोगद्यात उद्भवलेल्या समस्येमुळे कोकण रेल्वे मार्गावरील आणि गडा रद्द करण्यात आले आहेत तर काहींचे मार्ग बदलण्यात आले आहेत. याच कारणाने आज दिनांक 10 जुलै रोजी मडगाव येथून मुंबईसाठी सुटणारी कोकण कन्या एक्सप्रेस सायंकाळी 7 वाजून 32 मिनिटांनी म्हणजे तिच्या सावंतवाडीच्या नेहमीच्या वेळेनुसार मुंबई करता आपला प्रवास सुरू करणार आहे. मडगाव ते सावंतवाडी रोड दरम्यान या बुधवारची कोकणकन्या एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.
