राज्यस्तरीय तायक्वांदो  स्पर्धेत स्वरा साखळकर सुवर्णपदकाची मानकरी

रत्नागिरी : राजापूर येथे दि. 5 ते 7 जुलै रोजी येथे झालेल्या अजिंक्यपद तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून स्वरा साखळकर हिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली होती, चंद्रपूर येथे राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा 19 ते 21 जुलै रोजी मोठ्या दिमाखात पार पडली. राज्यातल्या कानाकोपऱ्यातून अनेक खेळाडू या स्पर्धेसाठी दाखल झाले होते. या स्पर्धेसाठी रत्नागिरीच्या SRK तायकोंदो क्लबची खेळाडू स्वरा साक्षी विकास साखळकर ही कॅडेट गटात पुमसे प्रकारात सुवर्णपदकाची मानकरी ठरली. स्वरा हीने केलेल्या फ्री स्टाइल पुमसेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

या स्पर्धेसाठी स्वरा हिला एसआरके तायक्वांदो क्लबचे मुख्य प्रशिक्षक शाहरुख सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले स्वरा इयत्ता सहावीमध्ये शिकत असून दामले शाळेची विद्यार्थिनी आहे. राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवल्यामुळे सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE