महिलांच्या प्रलंबित मागण्यांसाठी २९ जुलैला दिल्लीत महिला काँग्रेसचे आंदोलन: संध्या सव्वालाखे

मुंबईदि. २७ जुलै २०२४ :  महिलांच्या ३३ टक्के आरक्षणाची अंमलबाजवणीप्रचंड वाढलेली महागाई व महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर महिला काँग्रेस आक्रमक झाली आहे. महिलांचे हे तीन ज्वलंत प्रश्न घेऊन अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अलका लांबा यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत २९ जुलै रोजी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात देशभरातील महिला काँग्रेस कार्यकर्त्या मोठ्या संख्येने भाग घेणार आहेतअशी माहिती महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांनी दिली आहे.

 यासंदर्भात अधिक माहिती देताना महिला प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे पुढे म्हणाल्या कीभारतीय जनता पक्षाच्या सरकारने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण मंजूर केले परंतु त्याची अंमलबजावणी अद्याप केलेली नाही. सरकारने या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी जनगणनेची अट घातली आहे. २०२१ साली होणारी जनगणना अद्याप केली नाही. या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने जनगणनेसाठी कोणतीही तरतूद केली नाही. या आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी केली पाहिजे तसेच या आरक्षणात एससीएसटीओबीसी घटकांच्या महिलांनाही आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे. महागाई प्रचंड वाढलेली असून गृहिणींना महागाईमुळे घर चालवणे कठीण झाले आहेभाजपा सरकारने महागाईवर नियंत्रण आणून दिलासा द्यावा. महिलांवर देशभर अत्याचार वाढले आहेतत्याला प्रतिबंध घालण्यासाठी कडक उपाययोजना करावीमहिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजेया महिला काँग्रेसच्या मागण्या आहेतअसे सव्वालाखे म्हणाल्या. 

दिल्लीत २९ जुलै रोजी होणाऱ्या आंदोलनात महाराष्ट्रातील शेकडो महिला सहभागी होणार आहेत असेही संध्या सव्वालाखे म्हणाल्या. या पत्रकार परिषदेला नवी मुंबई महिला काँग्रेसच्या अध्यक्ष पूनम पाटीलपदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE