रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर सोडण्यात आलेल्या लोकमान्य टिळक टर्मिनस ते कुडाळ या गणपती स्पेशल गाडीला आरवली रोड तसेच नांदगाव रोड येथे अतिरिक्त थांबे देण्यात आले आहेत.
गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर सोडण्यात आलेल्या 01167/01168 या विशेष गाडीला रत्नागिरी जिल्ह्यात आरवली रोड तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात नांदगाव रोड स्थानकावर अतिरिक्त थांबे देण्यात आले आहेत.
लोकमान्य टिळक टर्मिनस ते कुडाळ मार्गावर धावताना (01167) ही गाडी आरवली स्थानकावर पहाटे तीन वाजून दोन मिनिटांनी तर कुडाळ ते लोकमान्य टिळक टर्मिनस (01168) ही गाडी सायंकाळी चार वाजून 54 मिनिटांनी येईल.
याचबरोबर लोकमान्य टिळक टर्मिनस ते कुडाळ (01165) ही गाडी नांदगाव रोड स्थानकावर सायंकाळी 7 वाजून 14 मिनिटांनी तर कुडाळ ते लोकमान्य टिळक टर्मिनस (01166) ही गाडी नांदगाव रोड स्थानकावर सायंकाळी पाच वाजून 20 मिनिटांनी येईल.
