रत्नागिरी : भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुणे रायगड तसेच रत्नागिरी जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आय एम डी मुंबई यांनी दिलेल्या संदेशानुसार आज ते उद्या गुरुवारी दि.२६.०९.२४ सकाळपर्यंत पुणे, रायगड, रत्नागिरी या ठिकाणी वादळ व विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क रहावे, असे मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून कळविण्यात आले आहे.
