https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी पात्र असाल तर आताच करा अर्ज!

0 211


लाभासाठी ४ आॕक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे समाज कल्याण सहाय्यकांचे आवाहन


रत्नागिरी, दि. ३ : ६५ वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांनी मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी ४ ऑक्टोबर पर्यंत आवेदन सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण सहायक संतोष चिकणे आयुक्त यांनी केले आहे.


राज्यातील ६५ वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने / उपकरणे खरेदी करणेकरिता तसेच मनःस्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इ. द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी राज्यात “मुख्यमंत्री वयोश्री योजना” राबविण्यास मान्यता देण्यात आलेली होती.


“आगामी विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने राज्यात लवकरच आदर्श आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने, योजनेचे आवेदन स्वीकारण्याची अंतिम तारीख ४ ऑक्टोबर २०२४ पर्यंतच आहे. त्यानुसार पात्र ज्येष्ठ नागरिकांनी उद्या शुक्रवार दि. ४ आॕक्टोबरपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.