विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पार्श्वभूमीवर निरीक्षक भेटीसाठी उपलब्ध


सकाळी 10 ते 11 वेळेत भेटीसाठी निरीक्षक उपलब्ध


रत्नागिरी, दि. 30 : जिल्ह्यामध्ये 263-दापोली, 264- गुहागर विधानसभा मतदार संघासाठी सुमित जरांगल हे सामान्य निवडणूक निरीक्षक आणि 265-चिपळूण, 266-रत्नागिरी, 267-राजापूर विधानसभा मतदार संघासाठी जनक प्रसाद पाठक हे सामान्य निवडणूक निरीक्षक तसेच सर्व विधानसभा मतदार संघासाठी पुरुषोत्तम कुमार हे खर्च निरीक्षक, राजेंद्र प्रसाद मीना हे पोलीस निरीक्षक म्हणून दाखल झाले आहेत. उमेदवार, राजकीय पक्ष, प्रतिनिधी व नागरिक यांच्या भेटीसाठी सकाळी 10 ते 11 या वेळेत हे निरीक्षक उपलब्ध असणार आहेत.


या निरीक्षकांना भेटण्यासाठी त्यांचे संपर्क क्रमांक आणि ठिकाण पुढीलप्रमाणे –
263-दापोली, 264-गुहागर विधानसभा मतदार संघासाठी सामान्य निवडणूक निरीक्षक सुमित के जरांगल (आयएएस) – संपर्क क्रमांक 8149277989, ठिकाण – शासकीय विश्रामगृह, माळनाका, रत्नागिरी.
265-चिपळूण, 266-रत्नागिरी आणि 267-राजापूर विधानसभा मतदार संघासाठी सामान्य निवडणूक निरीक्षक जनक प्रसाद पाठक (आयएएस) संपर्क क्रमांक -7823012267, ठिकाण – शासकीय विश्रामगृह, माळनाका रत्नागिरी
पुरुषोत्तम कुमार (आयआरएस) – सर्व विधानसभा मतदार संघासाठी खर्च निरीक्षक – संपर्क क्रमांक 8149467650, ठिकाण – शासकीय विश्रामगृह, माळनाका, रत्नागिरी
सर्व विधानसभा मतदार संघासाठी पोलीस निरीक्षक राजेंद्र प्रसाद मीना (आयपीएस) संपर्क क्रमाक 9307962285, ठिकाण – शासकीय विश्रामगृह, माळनाका, रत्नागिरी

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE