- मोबाईलच्या विळख्यात न अडकता मुलांनी खेळात सहभागी होणे महत्वाचे : जमीर खलफे
रत्नागिरी:- शहरातील अजिजा हाईट्स स्पोर्ट क्लब तर्फे अंडरआर्म क्रिकेट सामने भरवण्यात आले होते. हे सामने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या भारत-न्यूझीलंड अंतिम सामन्याच्या पार्श्वभूमीवर भरवण्यात आले होते.
या क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार जमीर खलफे यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटनावेळी पत्रकार जमीर खलफे यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना म्हटले की, आजची पिढी ही फक्त मोबाईलमध्ये अडकून असते. नुसत्या मोबाईलमध्ये न अडकता मुलांनी खेळात सहभागी व्हावे,तसेच आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. खेळामुळे आपण तंदुरुस्त राहतो म्हणून अभ्यासासोबतच खेळाकडे लक्ष देणेही तितकेच महत्वाचे आहे. असेही पत्रकार जमीर खलफे यांनी सांगितले.
या अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेमध्ये एकूण सहा संघानी सहभाग घेतला. ही स्पर्धा तीन षटकांची खेळवण्यात येणार आहे. स्पर्धेत विजेत्या संघासह उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यासह वेगवेगळी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
