उरण (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील पाणदिवे गावातील सामाजिक कार्यकर्ते महादेव कृष्णा पाटील (वय ७९) यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले. उरण पूर्व विभागातील सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक कार्यात त्यांचा हिरीरीने सहभाग होता. ते पत्रकार नीलेश पाटील आणि महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार सन्मानित शिक्षक मनोज पाटील व महेंद्र पाटील यांचे ते पिताश्री होत.
उरण तालुक्यातील पाणदिवे गावातील सामाजिक कार्यकर्ते महादेव कृष्णा पाटील (७९) यांचे एम जीएम हॉस्पिटल कामोठे येथे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने कुटुंबायांवर मोठ्या प्रमाणात शोककळा पसरली आहे.
त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, तीन विवाहित मुलगे ,सुना ,नातवंडे असा मोठा त्यांचा परिवार आहे.
