लांजा : सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजयदुर्ग येथे दि. 20 एप्रिल 2025 रोजी झालेल्या खुल्या गटातील पाचशे मीटर सागरी जलतरण स्पर्धेत सात वर्षीय रेयांश खामकर याने अतिशय रोमहर्षक रीतीने प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक प्राप्त केले.
सात वर्षीय बाल जलतरणपटू रेयांश याने खुल्या गटात वयाने ब-याच मोठ्या असलेल्या जलतरणपटूंशी स्पर्धा करुन प्राप्त केलेल्या या सुवर्णपदकाचे महत्व अनन्यसाधारण असे आहे. सातत्याने उत्तम कामगिरी करणाऱ्या बाल जलतरणपटू रेयांश खामकर याचे सर्व थरातून कौतुक होत आहे.
रेयांशचे मूळ गाव लांजा तालुक्यातील आरगाव आहे.रेयांशचे आजोबा चंद्रकांत खामकर हे तालुक्यात सामजिक कार्यकर्ते म्हणुन परिचित आहेत
