Konkan Railway| ‘कार ऑन ट्रेन’ सेवेचे बुकिंग २१ जुलैपासून सुरू

रत्नागिरी: कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांसाठी एक अत्यंत सोयीची आणि नवीन सेवा लवकरच सुरू होत आहे – ‘कार ऑन ट्रेन’ अर्थात रो-रो (Roll On Roll Off) सुविधा. या सुविधेमुळे आता तुम्ही तुमची कार थेट रेल्वेने कोकणात किंवा गोव्यात नेऊ शकाल. या बहुप्रतिक्षित सेवेसाठी आरक्षणाची प्रक्रिया येत्या २१ जुलै २०२५ पासून सुरू होणार आहे.
काय आहे ‘कार ऑन ट्रेन’ सेवा?
कोकण रेल्वे मार्गावर गेली अनेक वर्षे रो-रो मालवाहतूक सेवा यशस्वीपणे सुरू आहे. यामध्ये मालवाहू ट्रक विशेष रेल्वे वॅगनवर ठेवून त्यांची वाहतूक केली जाते. याच सेवेचा विस्तार करत, कोकण रेल्वेने आता खाजगी कारची वाहतूक करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे लांबच्या प्रवासात कार चालवण्याचा त्रास वाचणार असून, तुमचा प्रवास अधिक आरामदायी होणार आहे.
कुठून कुठे धावणार ‘कार ऑन ट्रेन’?
ही सेवा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील कोलाड ते गोव्यातील वेरणा दरम्यान उपलब्ध असेल. त्यामुळे कोकण आणि गोव्याला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी ही एक उत्तम सोय ठरणार आहे.
कधीपासून सुरू होणार सेवा आणि बुकिंग?

  • सेवेची सुरुवात:
  • कोलाड (महाराष्ट्र) येथून: २३ ऑगस्ट २०२५ पासून.
  • वेरणा (गोवा) येथून: २४ ऑगस्ट २०२५ पासून.
  • आरक्षण (बुकिंग) कालावधी:
  • २१ जुलै २०२५ पासून सुरू.
  • 11 सप्टेंबर 2025 पर्यंत सुरू राहणार कार ऑन ट्रेन सेवा
  • कार बुकिंगच्या रेल्वेच्या नियमानुसार रो रो सुविधेत ट्रेन ला जोडलेल्या एस एल आर किंवा तृतीय श्रेणी वातानुकूलित डब्यामधून फक्त तिघांना प्रवास करण्याची अनुमती दिली जाणार आहे. कारबरोबर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ठरवलेले भाडे मोजावे लागणार आहे.
  • १३ ऑगस्ट २०२५ पर्यंत बुकिंग करता येणार.
    तुम्ही जर कोकण किंवा गोव्याच्या प्रवासाचा विचार करत असाल आणि तुमची कार सोबत घेऊन जाण्याची इच्छा असेल, तर या ‘कार ऑन ट्रेन’ सेवेचा लाभ नक्की घ्या. २१ जुलैपासून आरक्षण सुरू होत असल्याने, लवकरात लवकर तुमचे बुकिंग करून घ्या आणि प्रवासाचा आनंद घ्या!
Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE