रत्नागिरी : रत्नागिरी येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात नुकत्याच संपन्न झालेल्या १९ व्या जिल्हा क्योरोगी व १३ व्या पूमसे तायक्वांदो स्पर्धेत ‘खेडशी तायक्वांदो क्लब’च्या खेळाडूंनी देदीप्यमान यश संपादन केले आहे. ६०० हून अधिक खेळाडूंच्या सहभागात खेडशीच्या चिमुकल्यांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर पदकांची लयलूट केली.
विजेत्या खेळाडूंची नामावली:
या स्पर्धेत खेडशी तायक्वांदो क्लबच्या खेळाडूंनी विविध गटांत खालीलप्रमाणे यश मिळवले:
磊 क्योरोगी : सुवर्ण पदक (Gold Medalists):
स्मित जाधव, निधी पवार, इरा खातू, लिशा पाटील, रिधान कदम, आदित्य साळवे, शिवांग झिमन, शिर्मही झिमन, गार्गी आंब्रे आणि नेहा पवार.
賂 रौप्य पदक (Silver Medalists):
स्वरा जाधव आणि सुयश झोरे.
雷 कास्य पदक (Bronze Medalists):
नीरजा कांबळे, ओजस्वी कांबळे, आर्हा आयरे आणि प्रतिक पवार.
पूमसे प्रकार (Poomsae Winners):
संबोधी जाधव, आदित्य पवार आणि आर्हा आयरे यांनी कास्य पदक पटकावले, तर स्वरूप आणि आर्हा या जोडीने ‘पुमसे जोडी’ प्रकारात कास्य पदकावर नाव कोरले.
दिग्गजांकडून कौतुकाचा वर्षाव
या यशाबद्दल रत्नागिरी तायक्वांडो स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष आणि ‘क्रीडा संघटक पुरस्कार’ विजेते व्यंकटेश्वरराव कररा यांनी खेळाडूंचे विशेष कौतुक केले. तसेच उपाध्यक्ष शैलेश गायकवाड, विश्वदास लोखंडे, सचिव लक्ष्मण कररा आणि जिल्हा क्रीडा पुरस्कार विजेते कोषाध्यक्ष शशांक घडशी यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.
या खेळाडूंना खेडशी तायक्वांदो क्लब (कारवांचीवाडी) चे मुख्य प्रशिक्षक अमित जाधव, सहप्रशिक्षक प्रतिक पवार आणि महिला सहप्रशिक्षक सुमेधा अमित जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. पालकांनीही या यशाबद्दल आनंद व्यक्त केला आहे.













