महिला महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत अमेघा घरतची ‘रूपेरी’ कामगिरी

उरण (विठ्ठल ममताबादे ) : महाराष्ट्रातील सोलापूर येथे झालेल्या चौथ्या महिला – महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत उरण तालुक्यातील खोपटे गावची पैलवान अमेघा अरुण घरत हिने ५९ किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक – पटकाविला. याबद्दल तिला रौप्यपदक देऊन – गौरविण्यात आले.

रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशनचे प्रेरणास्थान तथा लोकनेते रामशेठ ठाकूर राष्ट्रीय कुस्ती संकुलाचे भाग्यविधाते माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, पनवेलचे क्रीडाप्रेमी आमदार प्रशांत ठाकूर आणि जिल्हा कुस्ती असोसिएशनचे अध्यक्ष नगरसेवक परेश ठाकूर यांच्या प्रोत्साहन व पाठबळाने रायगडचे कुस्तीपटू स्वतःसह परिसराचे व जिल्ह्याचे नाव उंचावत आहेत.उरणच्या अमेघा घरतनेही राज्यस्तरीय स्पर्धेत रौप्यपदक जिंकून यश मिळविले आहे.

महाराष्ट्र राज्य कुस्ती संघाचे सचिव योगेश दोडके, भारत केसरी योगेश बोंबाळे, लोकनेते  रामशेठ ठाकूर राष्ट्रीय कुस्ती संकुलांचे संस्थापक अध्यक्ष रूपेश पावशे यांनी अमेघाचे कौतुक केले. दरम्यान, तिचे सर्वत्र अभिनंदन होत असून अनेकांनी तिचे कौतुक केले आहे.

याप्रसंगी तिच्यावर संपूर्ण रायगड मधील कुस्तीपटूंचाच नव्हे तर सामान्य जनतेचा ही शुभेच्छांचा वर्षाव झाला आहे. कारण एक मुलगी असून या कुस्ती क्षेत्रात आपले नावलौकिक केले आहे.उरणची अमेघा हिचे सर्वत्रच कौतुक होत आहे. आजकालच्या जगात मुली कोणत्याच क्षेत्रात मागे नाहीत. मुली फक्त चूल आणि मूल हे करत न बसता प्रत्येक क्षेत्रात दैदिद्यमान यश मिळवत आहेत. त्याचेच एक उत्तम उदाहरण जगासमोर ठेवत उरण तालुक्यातील अमेघा घरतने हा मान मिळविला आहे.अमेघाला लहानपणापासूनच  क्रीडा क्षेत्राची आवड होती . तिच्या परिवारानेही तिला तिच्या आवडता क्षेत्र निवडण्यासाठी प्रोत्साहन दिले आणि यातूनच आता अमेघा ही  उरणचे नाव लौकिक करत संपूर्ण महाराष्ट्रात नाव गाजवत आहे. अमेघावर सर्वच क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आणि तिच्या भविष्यासाठी पुढील वाटचालीसाठी ही तिच्यावर आशीर्वादांचा वर्षावही होत आहे. या सर्वांमुळे तिच्या आई-वडिलांनाही आपल्या मुलीचे खूप कौतुक वाटत आहे.कारण आपली मुलगी तिच्या आवडीच्या क्षेत्रात नावलौकिक करताना पाहून त्यांच्याही डोळ्यांचे पारणे फिटत आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE