बोकडविरा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून निव्वळ पाणीपुरवठा, थकबाकी शून्य
उरण (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्या तील बोकडविरा ग्रामपंचायत मध्ये गेली अनेक वर्षापासून असलेली निव्वळ पाणीपुरवठा थकबाकी बिलाचा प्रश्न ग्रामपंचायतमध्ये एकमताने ठराव पारीत करून पाणी पुरवठा वरील थकीत व चालू बिलाचा भरणा करून ग्रामपंचायत बोकडविराने निव्वळ पाणीपुरवठा थकबाकी शून्य करत एक नविन व चांगला आदर्श सर्व ग्रामपंचायतीसमोर ठेवला आहे.
निव्वळ पाणी पुरवठा थकबाकी बोकडवीरा ग्रामपंचायत मध्ये वर्षानुवर्षे तथीच थकलेली होती. त्यामुळे पाणीपुरवठा व विविध समस्यांना ग्रामपंचायत व ग्रामस्थांना सामोरे जावे लागत होते. त्यामूळे बोकडविरा ग्रामपंचायतचे सरपंच मानसी देवेंद्र पाटील व इतर ग्रामपंचायत सदस्य यांनी एकत्र येत निव्वळ पाणी पुरवठा थकबाकी शून्य करण्याचा निर्णय घेतला व तसा ठरावही पास केला.जनतेच्या हिताचे निर्णय घेणाऱ्या सरपंच मानसी पाटील यांनी या कामाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करून थकबाकीचे पैसे दिनांक 6/9/2022 रोजी चेक स्वरूपात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या उप विभाग उरण यांच्या चारफाटा येथील उप अभियंता कार्यालयात डेप्यूटी इंजिनिअर रविंद्र चौधरी यांना सर्वासमक्ष दिले.निव्वळ थकबाकी शून्य करण्याकामी ग्रामसेवक अनिता म्हात्रे व पंचायत समिती अधिकारी यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
थकबाकीच्या निव्वळ रकमेची चेक दिल्यानंतर सरपंच मानसी पाटील यांनी पाईपलाईनचे साईझ वाढवून देण्याची तसेच पाणी क्षमता वाढवून देण्याची मागणी केली. नविन नळ कनेक्शनचीही आवश्यकता असल्याचे सरपंच मानसी पाटील यांनी डेप्युटी इंजिनिअर रविंद्र चौधरी यांच्या निदर्शनास आणून दिली. विविध समस्या समजावून घेउन व बोकडविरा ग्रामपंचायतीच्या विविध मागण्या लक्षात घेऊन सदर मागण्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगून या मागण्यांचा पाठपुरावा मी स्वतः जातीने करणार असल्याचे डेप्युटी इंजिनिअर रविंद्र चौधरी यांनी ग्रामपंचायत बोकडविऱ्याचे सरपंच मानसी पाटील व सर्व ग्रामपंचायतच्या सदस्यांना सांगितले
यावेळी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या उप विभाग उरण यांच्या चारफाटा येथील उप अभियंता कार्यालयात उपस्थित असलेले डेप्युटी इंजिनिअर रविंद्र चौधरी, ज्युनिअर इंजिनिअर जयकुमार बोके, इलेक्ट्रिकल इंजिनिअर प्रवीण बाराहाते, पंप ऑपरेटर शुभम घरडे, क्लार्क कल्पिता तांडेल, टेक्निकल असिस्टंट डीसोजा एडवर्ड आदी उपस्थित शासकीय अधिकारी कर्मचारी वर्गांनी उपस्थितांचे स्वागत केले व निव्वळ थकबाकी शून्य केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.
या वेळी बोकडवीरा ग्रामपंचायतचे सरपंच मानसी देवेंद्र पाटील, उपसरपंच शेखर पाटील,ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष त्रिशूल ठाकूर, गणपती देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष मनोज पाटील,ग्रामपंचायत सदस्य/सदस्यां-राकेश व.पाटील, जयवंत पाटील, वंदना पाटील, हेमलता मे.पाटील, शितल पाटील, निर्मला पाटील, ग्रामसुधारणा मंडळाचे सेक्रेटरी खंडेश्वर पाटील, खजिनदार राजेश ठाकूर, देवेंद्र पाटील, गिरीश पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.