रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्ग धावणारी हजरत निजामुद्दीन ते तिरुअनंतपुरम सेंट्रल साप्ताहिक राजधानी एक्सप्रेसला प्रायोगिक तत्वावर सुरत स्थानकावर देण्यात आलेल्या थांब्याला मुदतवाढ देण्यात आली आहे. 12432 /12431 या क्रमांकासह धावणारी राजधानी एक्सप्रेस कोकण रेल्वे मार्गावर उडुपी, कारवार, मडगाव तसेच रत्नागिरी स्थानकावर थांबा घेते.
प्रवाशांच्या मागणीवरून या गाडीला गुजरातमध्ये सुरत स्थानकावर या आधीच प्रायोगिक तत्वावर थांबा देण्यात आला होता. पुढील सूचना प्राप्त होईपर्यंत या खांबाला मुदतवाढ देण्याचा निर्णय रेल्वे कडून घेण्यात आला आहे. आठवड्यातून तीन दिवस ही गाडी धावते















