कशेळी तंटामुक्त समिती अध्यक्षपदी राकेश कांबळे


रत्नागिरी : तालुक्यातील कशेळी येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी राकेश कांबळे यांची निवड करण्यात आली. राकेश कांबळे यांनी तंटामुक्त समितीचे सलग दोन वर्षे सदस्य म्हणून काम पाहिले आहे. यावेळी त्यांनी सर्वसमावेशक भूमिका घेऊन गावातील अनेक तंटे त्यांनी सोडवले होते. राकेश कांबळे यांनी दिव्यांगांच्या हक्कासाठी संजीवन दिव्यांग विकास संस्थेची स्थापना केली आहे.

जिल्ह्यातील दिव्यांगाचे प्रश्न संघटनेच्या माध्यमातून सोडविण्याचे काम करतात. शिवाय त्यांना शैक्षणिक व सामाजिक कार्याची आवड आहे. ते सध्या वंचित बहुजन आघाडी तालुका संपर्कप्रमुख तसेच दिव्यांग समन्वय समितीच्या संघटक पदावर कार्यरत आहेत.
ग्रामपंचायत येथे झालेल्या ग्रामसभेत त्यांची तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. या नियुक्तीबद्दल त्यांचे ग्रामसेवक अनिश्का हातिसकर, सरपंच दिपक बावकर, उपसरपंच चंद्रकांत कांबळे तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष, ग्रामस्थ यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE