काजू प्रक्रिया उद्योजकांतर्फे नीलेश राणे यांचा सत्कार
रत्नागिरी : येथील एमआयडीसीमधील उद्योजक संदेश दळवी यांच्या दळवी कॅशू प्रकल्पाला गुरुवारी भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांनी सदिच्छा भेट दिली.
यावेळी संदेश दळवी यांनी संपूर्ण प्रकल्पाची, त्यातील वेगवेगळ्या युनिट्सची त्यांना माहिती दिली. काजू प्रक्रिया उद्योगात व्यवसायिकांना येणाऱ्या अडचणी निलेश राणे यांनी यावेळी जाणून घेतल्या. सहकार्याचे आश्वासन त्यांनी दिले.
निलेश राणे हे आजवर कोकणातील काजू व्यावसायिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. त्यांच्या अडचणी जाणून घेऊन सोडवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. याबद्दल काजू प्रक्रिया उद्योग संघटनेकडून निलेश राणे यांचा सत्कार करण्यात आला.




यावेळी काजू प्रक्रिया संघटनेचे विवेक बारगिर, काजू उद्योजक ऋषिकेश परांजपे, प्रताप पवार, संदेश पेडणेकर, दिनेश पवार, तौफिक खतीब आदी पदाधिकारी उपस्थित होते.














