गांधीनगर- मुंबई ‘वंदे भारत एक्सप्रेस’ला पंतप्रधानांनी दाखवला हिरवा झेंडा!

अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सकाळी पावणे दहा वाजता गांधीनगर ते मुंबई सेंट्रल मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस या अलिशान रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवला. उद्घाटन कार्यक्रमानंतर पंतप्रधान मोदी यांनी वंदे भारत एक्सप्रेस मधून गांधीनगर ते कालूपुर रेल्वे स्टेशन दरम्यान प्रवासही केला. यावेळी त्यांनी सहप्रवाशांशी संवाद साधला.


सकाळी नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधीनगर रेल्वे स्टेशनवरुन मुंबईसाठी धावणाऱ्या उद्घाटनपर वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. स्वदेशी बनावटीची वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन प्रवाशांच्या पसंतीस पडत आहे. प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन टप्प्याटप्प्याने या प्रकारच्या गाड्या देशातील इतर प्रमुख मार्गांवरही चालविल्या जाणार आहेत.
पंतप्रधान यांनी शुक्रवारी आपल्या गुजरात दौऱ्यावेळी आमदाबाद मेट्रो रेल प्रकल्पाचे उद्घाटन केले.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE