रत्नागिरीकारांना उदंड आयुष्य, आरोग्य आणि विकासातून भरभराट दे

नीलेश राणे यांनी घेतले देवी भगवती आणि जुगाईचे चरणी गाऱ्हाणे

रत्नागिरी : रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांनी गुरुवारी रत्नदुर्ग निवासिनी आई भगवती देवी आणि श्री देवी जोगेश्वरी अर्थात जुगाई देवीचे दर्शन घेतले.

नवरात्रोत्सव रत्नागिरी मध्ये उत्साहाने साजरा होत आहे. गुरुवारी रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या भाजपाचे प्रदेश सचिव निलेश राणे यांनी रत्नदुर्ग किल्ल्यावरील भगवती देवीचे दर्शन घेतले. यावेळी देवस्थान तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.

त्यानंतर खालची आळी स्थित श्री देवी जोगेश्वरी अर्थात आई जुगाई देवीचे दर्शन घेतले. यावेळी गाऱ्हाणे सुद्धा घालण्यात आले. रत्नागिरीकरांच्या सुखा समाधानी जीवनासाठी निलेश राणे यांनी यावेळी प्रार्थना केली. यावेळी त्यांच्या समवेत पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE