अमेरिकेतील विद्यापीठाकडून ऍडव्होकेट पवन यादव यांना डॉक्टरेट

ऍडव्होकेट पवन यादव यांच्या सामाजिक कार्याचा जागतिक सन्मान : नाना पटोले

मुंबई, दि. ८ ऑक्टोबर

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तृतीयपंथीय सेलच्या अध्यक्षा ऍडव्होकेट पवन यादव यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत ‘इंटरनॅशनल ओपन युनिव्हर्सीटी ऑफ ह्युमॅनिटी हेल्थ सायन्स अँड पिस’ ने त्यांना डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानीत केले आहे.

काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी पवन यादव यांना डॉक्टरेट मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. “पवन यादव या लाखो लोकांसाठी प्रेरणास्थान बनल्या असून त्यांच्या सामाजिक कार्याची दखल राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली जात आहे ही अभिमानास्पद बाब आहे”.  

ऍडव्होकेट पवन यादव यांनी महाराष्ट्रातील तृतीय पंथीयांसाठी स्मशानभूमी, शौचालय, निवृत्तवेतन, आरोग्य सुविधा, रेशनकार्ड, मतदान कार्ड मिळवून दिले. महिला, गरिब, गरजूंच्या मदतीसाठी त्या सारथी फाउंडेशनच्या माध्यमातून नेहमी मदत करत असतात. ऍडव्होकेट पवन यादव या भारतातील पहिल्या तृतीयपंथीय आहेत ज्यांना डॉक्टरेट पदवीने सन्मानीत करण्यात आले आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE