उरण दि १२(विठ्ठल ममताबादे ): उरण तालुक्यातील पागोटे ग्रामपंचायतीचे सरपंच मिलिंद तांडेल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंच पदी पागोटे ग्रामपंचायतीचे उपसरपंच समिर दयाराम पाटील यांची सर्वानुमते पागोटे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी निवड करण्यात आली आहे.
पागोटे ग्रामपंचायतीचे उपसरपंच समिर दयाराम पाटील हे गावाच्या विकासासाठी राजकीय पादुका बाहेर ठेवत हिरीरीने सहभाग घेत आहेत.त्यामुळे रिक्त झालेल्या पागोटे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी समिर दयाराम पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.पागोटे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मिलिंद तांडेल, ग्रामपंचायत सदस्य रश्मी राकेश म्हात्रे,मीता पंडित,वनिता पाटील,प्रदिप पाटील,समिर पाटील,हर्षाली पाटील, ग्रामसेविका समिधा संतोष ठाकूर तसेच भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र पाटील,विजय पाटील,माजी सरपंच पुनम योगेश पाटील, वासुदेव पाटील यांनी समिर पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.















