रत्नागिरी : दिवाळीसाठी सुरत ते करमाळी अशी कोकण रेल्वे मार्गे धावणारी विशेष गाडीची घोषणा रेल्वेकडून करण्यात आली आहे. ही गाडी दि. 25 ऑक्टोबर रोजी धावणार आहे. ही गाडी स्पेशल फेअरसह चालवली जाणार आहे.
पश्चिम रेल्वेच्या सहयोगाने कोकण रेल्वेने या गाडीचे नियोजन केले आहे. ही गाडी (01993)दि. 25 ऑक्टोबर रोजी सुरत येथून सायंकाळी 7 वाजून 50 मिनिटांनी सुटून दुसर्या दिवशी गोव्यात करमाळीला ती दुपारी 12 वाजून 40 मिनिटांनी पोहचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी (01994) करमाळीहून दि. 26 रोजी दुपारी 2.30 वाजता सुटून दुसर्या दिवशी सकाळी 8 वाजता ती सुरतला पोहचेल.
ही ‘दिवाळी स्पेशल’ गाडी वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी तसेच थीवी स्थानकावर थांबणार आहे. एकूण सतरा डब्यांची या गाडीची कोच रचना वातानुकूलित चेअरकार 1, सेकंड सीटींग 14, एसएलआर 2 अशी असणार आहे.















