एस.टी. कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड!

कर्मचारी वेतनासाठी एसटी महामंडळाला ३०० कोटींचा निधी वितरित करण्यास राज्य सरकारची मंजुर

मुंबई : कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी एसटी महामंडळाला तीनशे कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. गृहविभागाने बुधवारी यासंदर्भातील शासन निर्णय (जीआर) जारी केला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांना सप्टेंबर महिन्यातील पगारासाठी ७२८.५० कोटींचा निधी वितरित करण्याची मागणी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी राज्य सरकारकडे केली होती. त्यानुसार ३०० कोटींचा निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यापूर्वी २२ सप्टेंबर रोजी वेतनासाठी शंभर कोटींचा निधी वितरित करण्यात आला होता.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE