आरोग्य शिबिराची सांगता ; दुसऱ्या टप्प्यातील शिबिरे १५ पासून

तपासणी शिबिराची सांगता उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार

शिबीरात सहभागी ८५६ महिलांना तपासणी अहवाल आणि तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मिळणार मार्गदर्श

रत्नागिरी, दि.१३ : उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या सहकार्याने तसेच रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने महिलांच्या सुरक्षित आरोग्यासाठी शहरातील माता – भगिनींसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचा उपक्रम राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्याची शिबिराचा शुभारंभ दि. ७ ऑक्टोबर रोजी करण्यात आला.

या शिबीरामध्ये रत्नागिरी शहरातील ८५६ महिलांनी सहभाग नोंदवून आपल्या आरोग्याची तपासणी केली. जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच महिलांनी आरोग्य शिबीराला इतक्या मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून या माध्यमातून महिलांमध्ये आरोग्याबाबतची सजगता लक्षात येते.

या आरोग्य तपासणी शिबीराच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ शनिवार, दिनांक १५ ऑक्टोबर २०२२ रोजी होणार आहे. यावेळी, सकाळी ११ वाजता पहिल्या टप्प्यामध्ये सहभागी झालेल्या महिलांचे आरोग्य तपासणी अहवाल वितरण, आवश्यकतेनुसार औषध वितरण तसेच त्यांना तज्ञ डॉक्टरांमार्फत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

सर्व सहभागी महिलांनी पुन्हा एकदा एकत्र येण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

कार्यक्रम स्थळ : हॉटेल विवेक मैदान हॉल, माळनाका, रत्नागिरी

संपर्क :
(मा.नगरसेविका)- सौ.स्मितल पावसकर, 9421230177

सौ.शिल्पा सुर्वे (मा नगरसेविका)
8975838180

सौ.कांचन नागवेकर 9307849998

सौ.राजेश्वरी शेट्ये ( मा.नगरसेविका ) 9970246357

सौ वैभवी खेडेकर,( मा.नगरसेविका ),7020260542

सौ.दिशा साळवी (मा. नगरसेविका)9860885085

सौ कौसल्या शेट्ये,( मा.नगरसेविका ) 7030501111

सौ दया चवंडे (मा. नगरसेविका) 9860626129

सौ श्रद्धा हळदणकर (मा. नगरसेविका) 9422431815

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE