गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील श्रीच्या मंदिरात संकष्टी चतुर्थीनिमित्त श्रींच्या समोर फुलांची आकर्षक आरास करण्यात आली आहे.
मंदिरातील मुख्य पुजारी अभिजीत विनायक घनवटकर व सहकाऱ्यांनी ही आरास तयार केली आहे
संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. गुरुवारी संकष्टी चतुर्थीनिमित्त गाभार्यात श्रींच्या मूर्तीसमोर तयार करण्यात आलेली फुलांचे आकर्षक आरास भाविकांचे लक्ष वेधून घेत होती.
















