‘नदीपात्रातून काढावी लागतेय प्रेत यात्रा’ वृत्ताची आ. शेखर निकम यांनी घेतली दखल

आ. निकम यांच्यासुचनेने जि. प. बांधकाम विभागाची यंत्रणा लागली कामाला .

संगमेश्वर (सुरेश सप्रे ) : संगमेश्वर तालुक्यातील कळंबस्ते तेलेवाडीतील ग्रामस्थlना नदी पात्रातून काढावी लागतेय प्रेत यात्रा, हे वृत्त चार दिवसापूर्वी वृत्त प्रसिद्ध झाले होते, या वृत्ताची दखल संगमेश्वर चिपळूणचे आम. शेखर निकम यांनी तात्काळ दखल घेत संबंधित यंत्रणेला योग्यत्या सूचना करू लवकरात लवकर अहवाल द्यावा, असे सांगताच देवरुख बांधकाम विभागाचे उपअभियंता चिंचोळे आणि शाखा अभियंता इंदुलकर यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली.

त्या वृत्तामुळे व आम. निकम यांच्या मुळे गेली कित्यक वर्षाचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कळंबस्ते तेलेवाडी ग्रामस्थांचे स्मशान नदीपलीकडे आहे. तेथेजाणेस नदीपात्र करून जावे लागते. या नदीवर लोखंडी साकावाची मागणी करून ही गेली अनेक वर्षे जि.प.त सत्ते असलेल्या लोकप्रतिनींनी लक्ष दिले नसल्याने पावसात गावात प्रेत झाल्यास नदी पात्रातून प्रेत यात्रा काढावी लागत असते,

आठ दिवसा पुर्वी तेले वाडीयेथील श्रीम. लक्ष्मी पाटील या 95 वर्षीय वृद्धेचे वृदपकाळाने निधन झाले होते. नेहमी प्रमाणे नदीला पाणी असल्याने त्या महिलेची प्रेत यात्रा नदी पात्रातून काढावी लागली होती. याबाबतचे वृत्त वृत्तपत्र. व सोशल मिडीयात प्रसिद्ध होताच चिपळूण -संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांनी व्यक्तिशा लक्ष दिल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. जि.प. बांधकाम अधिकारी वर्गाने प्रत्यक्ष पाहणी केली व अहवाल तयार करून पाठविणार असल्याने ग्रामस्थांची होणारी गैरसोय दूर होणार आहे.. आम. शेखर निकम यांनी दखल घेवून समस्या सोडविणेसाठी प्रयत्न सुरू केलेने कळंबस्ते तेलेवाडी ग्रामस्थांनी आ. निकम यांना धन्यवाद दिले आहेत.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE