मुरादपूर शाळेत शालेय साहित्य वाटपाने भाजपा सेवा पंधरवड्याचा समारोप


चिपळूण : पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे सर्वत्र सेवा पंधरवडा कार्यक्रम चालू होते. चिपळूण शहर भाजपा अंतर्गत या कार्यक्रमाची सांगता जिल्हा परिषद शाळा मुरादपूर, चिपळूण येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून झाली.

उत्तर रत्नागिरी जिल्हा चिटणीस सौ. वैशाली निमकर यांच्या सहकार्यातून हे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला भाजपा शहराध्यक्ष श्री. आशिष खातू, जिल्हा चिटणीस सौ. वैशाली निमकर, शहर सरचिटणीस श्री. मधुकर निमकर, युवा मोर्चा सरचिटणीस श्री. मंदार कदम व शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद उपस्थित होते.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE